Skip to content
1 राजे ८:१५-२६

1 राजे ८:१५-२६

१५
तेव्हा राजाने म्हटले: “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत, कारण त्यांनी माझे वडील दावीद, यांना स्वतःच्या मुखाने दिलेले वचन आज स्वहस्ते पूर्ण केले आहे. कारण याहवेहने म्हटले होते की,
१६
‘मी माझ्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, तेव्हापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, परंतु माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करावे म्हणून मी दावीदाची निवड केली.’
१७
“याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावासाठी मंदिर बांधावे असे माझे वडील दावीद यांच्या मनात होते.
१८
पण याहवेहने माझे पिता दावीदाला म्हटले, ‘माझ्या नावासाठी मंदिर बांधावे अशी आपल्या हृदयात इच्छा बाळगून तू फार चांगले केले.
१९
तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’
२०
“याहवेहने दिलेले वचन पूर्ण केले आहे: माझे वडील दावीदाचा मी वारस झालो आणि याहवेहने अभिवचन दिल्याप्रमाणे आता इस्राएलच्या राजासनावर मी बसतो आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्यासाठी मी हे मंदिर बांधले आहे.
२१
आमच्या पूर्वजांना जेव्हा याहवेहने इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा त्यांच्याशी याहवेहने जो करार केला तो ज्यात आहे त्या कोशासाठी मी एक स्थान तयार केले आहे.”
२२
नंतर शलोमोनने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत याहवेहच्या वेदीसमोर उभे राहून वर स्वर्गाकडे आपले हात पसरले
२३
आणि म्हटले: “हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, वर स्वर्गात किंवा खाली पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात.
२४
आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.
२५
“आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीद यांना आपण जे वचन दिले होते ते आपण पाळावे, आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर विश्वासूपणे चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही खुंटणार नाही.’
२६
तर आता, हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीद यांना जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options