Skip to content
1 राजे ११:२१-२५

1 राजे ११:२१-२५

२१
इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.”
२२
फारोहने त्याला विचारले, “येथे तुला काय कमी आहे की तू आपल्या देशाला जाऊ इच्छितोस?” हदाद म्हणाला, “काही कमी नाही, पण मला जाऊ द्यावे!”
२३
परमेश्वराने शलोमोनविरुद्ध आणखी एक शत्रू उभा केला, तो एलयादाचा पुत्र रेजोन होता, जो त्याचा मालक सोबाहचा राजा हादादेजर याच्यापासून पळून गेला होता.
२४
जेव्हा दावीदाने जोबाहच्या सैन्याचा नाश केला, रेजोनने त्याच्यासोबत काही लोक जमा केले व तो त्यांचा पुढारी झाला; ते पुढे दिमिष्कास गेले, तिथे स्थायिक होऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला.
२५
शलोमोन जिवंत होता तोपर्यंत हदादने दिलेल्या त्रासात भर असे रेजोनने देखील इस्राएलशी वैर केले. तेव्हा रेजोनने अरामात राज्य केले व इस्राएलला विरोध केला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options