Skip to content
1 करिंथकरांस ९:१-१५

1 करिंथकरांस ९:१-१५

१
मी स्वतंत्र नाही का? मी प्रेषित नाही का? मी आपल्या प्रभू येशूंना पाहिले नाही का? प्रभूमध्ये तुम्ही माझ्या श्रमाचे फळ नाही का?
२
कदाचित मी दुसर्‍यांसाठी प्रेषित नसेल, पण तुमच्यासाठी नक्कीच आहे! कारण माझ्या प्रेषितपणाचा तुम्ही प्रभूमध्ये शिक्का आहात.
३
माझा न्याय करणार्‍यांना हे माझे बचावाचे उत्तर आहे.
४
आम्हाला खाण्याचा पिण्याचा अधिकार नाही काय?
५
इतर प्रेषित, प्रभूचे बंधू आणि केफा यांच्याप्रमाणे विश्वासू पत्नी करून तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?
६
फक्त मला आणि बर्णबाला स्वतःच्या उपजीविकेसाठी काम न करण्याचा अधिकार नाही काय?
७
स्वतःच्या खर्चाने कोणता सैनिक सेवा करतो? द्राक्षमळा लावतो, पण द्राक्ष खात नाही असा कोणी आहे का? मेंढराचा कळप पाळून दूध पिणार नाही असा कोणी आहे का?
८
मी हे मानवी अधिकाराने म्हणतो काय? पण कायदाही तेच सांगतो की नाही?
९
कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?
१०
हे खात्रीने त्यांनी आपल्यासाठी म्हटले नाही का? होय, हे आमच्यासाठी लिहिण्यात आले आहे, कारण जो कोणी नांगरतो आणि मळणी करतो, त्यांनी हंगामाच्या पिकात वाटा मिळेल या आशेने करावी.
११
जर आम्ही तुमच्यामध्ये आध्यात्मिक गोष्टीचे बीज पेरले आणि त्याबद्दल केवळ भौतिक गोष्टींच्या हंगामाची अपेक्षा केली, तर त्यात काय मोठे झाले?
१२
जर इतरांना तुमच्याकडून या गोष्टी मिळण्याचा हक्क आहे, तर आम्हालाही तुमच्याकडून मिळण्याचा अधिक हक्क नाही काय? परंतु आम्ही त्या अधिकाराचा उपयोग केला नाही. याउलट, ख्रिस्ताच्या शुभवार्तेमध्ये अडखळण येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही गोष्टी सहन करण्यास तयार आहोत.
१३
जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय?
१४
याचप्रमाणे, प्रभूने आज्ञा दिली आहे की जे शुभवार्तेचा प्रचार करतात त्यांचे पोषण शुभवार्तेद्वारे झाले पाहिजे.
१५
परंतु मी यापैकी एकाही अधिकाराचा उपयोग केला नाही किंवा हे तुम्ही माझ्यासाठी करावे या उद्देशानेही मी तुम्हाला लिहित नाही. माझा स्वाभिमान कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options