1 करिंथकरांस ७:२५-२९
२५
आता कुमारिकांबद्दल: मला प्रभूकडून आज्ञा मिळालेली नाही, तरीपण प्रभूच्या कृपेनुसार मी जो विश्वसनीय आहे तो मी माझा न्याय देतो.
२६
वर्तमान काळातील संकटामुळे, पुरुषांनी ज्या स्थितीत आहेत, त्या स्थितीत राहावे हे त्यांच्यासाठी योग्य होईल असे मला वाटते.
२७
तुमचा विवाह झाला आहे का? तर मुक्त होण्यास पाहू नका. तुम्ही अविवाहित आहात का? तर पत्नी शोधण्याच्या मागे लागू नका.
२८
परंतु जर तुम्ही विवाह केला, तरी तुम्ही काही पाप केले नाही आणि एखाद्या कुमारिकेने विवाह केला, तर तिनेही पाप केले नाही. जे विवाह करतात, त्यांना जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल; आणि तुमची त्यापासून सुटका व्हावी अशी माझी इच्छा आहे.
२९
बंधू व भगिनींनो, वेळ थोडा आहे. यापुढे ज्यांना पत्नी आहे त्यांनी आपल्याला पत्नी नाही अशाप्रकारे राहावे.
Settings