मुख्य मजकुरावर जा
1 करिंथकरांस ३:१८-२३

खरे ज्ञान व दैवी स्वामित्व

1 करिंथकरांस ३:१८-२३
१८
तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जर तुमच्यापैकी कोणी या युगाच्या रीतीप्रमाणे स्वतःला ज्ञानी समजत असेल, तर ज्ञानी होण्यासाठी त्याला “मूर्ख” व्हावे लागेल,
१९
कारण या जगाचे ज्ञान परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असे लिहिले आहे: “ते ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,”
२०
आणि पुन्हा, “ज्ञानी लोकांचे विचार निरर्थक असतात हे प्रभू जाणतात.”
२१
तेव्हा मानवी नेत्यांची बढाई मारू नका! कारण सर्वकाही तुमचे आहे.
२२
मग तो पौल, अपुल्लोस किंवा केफा किंवा जग, जीवन आणि मरण किंवा सांप्रत काळ किंवा भविष्यकाळ हे सर्व तुमचे आहेत.
२३
पण तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचे आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options