Skip to content
1 इतिहास ७:२०-२६

1 इतिहास ७:२०-२६

२०
एफ्राईमचे वंशज: एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह, त्याचा पुत्र तहथ,
२१
त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.
२२
यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले.
२३
तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.
२४
त्याची कन्या शेराह होती. तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेराह ही वसविली.)
२५
त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ, रेशेफाचा पुत्र तेलह, तेलहाचा पुत्र तहन,
२६
त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, त्याचा पुत्र एलीशामा,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options