Skip to content
1 इतिहास २३:३-२३

1 इतिहास २३:३-२३

तीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लेव्यांची शिरगणती करण्यात आली. त्यांची संख्या अडतीस हजार भरली.
दावीद म्हणाला, “यापैकी चोवीस हजार लेव्यांनी याहवेहच्या मंदिराच्या कामावर मुकादम म्हणून देखरेख करावी, सहा हजार लोकांनी न्यायाधीशांची आणि अंमलदारांची कामे करावी.
चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.”
नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
गेर्षोनीचे विभाग: लादान व शिमी.
लादानाचे पुत्र: यात यहीएल हा ज्येष्ठ, जेथाम व योएल—सर्व मिळून तीन.
शिमीचे पुत्र: शेलोमीथ, हजिएल व हारान; सर्व मिळून तीन. (हे लादानाचे कुटुंबप्रमुख.)
१०
शिमीचे पुत्र: यहथ, जीजा, यऊश आणि बरीयाह. हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.
११
(यहथ हा ज्येष्ठ होता, जीजाह हा दुसरा होता, परंतु यऊश आणि बरीयाह यांना पुष्कळ पुत्र नव्हते; म्हणून ते एकच कुटुंब म्हणून ओळखले जात.)
१२
कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र.
१३
अम्रामचे पुत्र: अहरोन व मोशे. अहरोनाला आणि त्याच्या वंशाला सर्वकाळाकरिता वेगळे करण्यात आले, जेणेकरून त्यांनी याहवेहसाठी अतिपवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या नावाने अनंतकालाकरिता आशीर्वाद द्यावे.
१४
परमेश्वराचा मनुष्य मोशे याच्या पुत्रांचाही समावेश लेवीच्या गोत्रात केला होता.
१५
मोशेचे पुत्र: गेर्षोम व एलिएजर.
१६
गेर्षोमाचे वंशज: शबुएल प्रथमपुत्र होता.
१७
एलिएजरचे वंशज: रहब्याह प्रथमपुत्र होता. (एलिएजरला दुसरा पुत्र नव्हता, परंतु रहब्याहाला पुष्कळ पुत्र झाले.)
१८
इसहारचे पुत्र: शेलोमीथ प्रथमपुत्र होता.
१९
हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह हा प्रथमपुत्र होता, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा आणि यकमाम चौथा.
२०
उज्जीएलाचे पुत्र: मीखाह हा प्रथमपुत्र व इश्शीयाह दुसरा.
२१
मरारीचे पुत्र: महली व मूशी. महलीचे पुत्र: एलअज़ार व कीश.
२२
एलअज़ारला पुत्र नव्हता: त्याला फक्त कन्याच होत्या. त्यांचे चुलतभाऊ कीशपुत्र यांनी त्यांच्याशी विवाह केले.
२३
मूशीचे पुत्र: महली, एदर व यरेमोथ; सर्व मिळून तीन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options