Skip to content

Viper बद्दल बायबलमधील वचने

7 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.

  2. नेगेवच्या प्राण्यांबद्दलची भविष्यवाणी: कठीण परिश्रम आणि संकटाच्या भूमीतून, सिंह आणि सिंहीण, फुरसे आणि उडणारे साप, दूत आपली संपत्ती गाढवांच्या पाठीवर, त्यांचे खजिने उंटांच्या कुबड्यांवर लादून, त्या लाभहीन राष्ट्राकडे घेऊन जातात,

  3. ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात आणि मकडीचे जाळे विणतात. जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो.

  4. परंतु पुष्कळ परूशी व सदूकी लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?

  5. “अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?

  6. त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आलेल्या समुदायास योहान म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?

  7. तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला.