मुख्य मजकुरावर जा

The Death of the Wicked बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 20 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले.

  2. त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांच्या दृष्टीने जे वाईट ते केले आणि यिर्मयाह संदेष्टाने याहवेहचे वचन त्याला सांगितले, तरी त्यांच्यासमोर तो नम्र झाला नाही.

  3. ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही.

  4. आतंक त्याला चहूकडून घेरून आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे.

  5. विपत्ती त्याच्यासाठी भुकेलेली आहे; तो पडला तर, विनाश त्याच्यासाठी तयारच आहे.

  6. रोगाने त्याची त्वचा खाऊन टाकली आहे; मृत्यूचे पहिले अपत्य त्याचे अवयव गिळून टाकतात.

  7. त्याच्या सुरक्षित डेर्‍यांतून त्याला फाडून भयाच्या राजापुढे त्याला फरफटीत नेले आहे.

  8. अग्नी त्याच्या डेर्‍यात वस्ती करते; त्याच्या घरावर गंधक विखुरले आहे.

  9. धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो; पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते.

  10. संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.

  11. पूर्वेचा वारा त्याला वाहून घेऊन जातो आणि तो नाहीसा होतो; त्याच्या स्थानातून तो उडवून टाकला जातो.