The Call of God बद्दल बायबलमधील वचने: Temporal judgments
Temporal judgments बद्दल वचने
त्यांनी आपली अंतःकरणे गारगोटीसारखी कठीण केली आणि सर्वसमर्थ याहवेहने आरंभीच्या संदेष्ट्यांना आपल्या आत्म्याने प्रेरित करून त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा किंवा वचने ऐकण्याचे त्यांनी नाकारले. म्हणूनच याहवेहला त्यांच्यावर अत्यंत क्रोध आला.
“ ‘जेव्हा मी त्यांना हाक मारली, त्यांनी ऐकण्याचे नाकारले; म्हणून त्यांनी मला हाक मारली, की मी त्यांचे ऐकणार नाही, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
चक्रीवादळाप्रमाणे मी त्यांची दूरदूरच्या देशांत पांगापांग केली. त्यांनी मागे सोडलेला त्यांचा देश असा ओसाड झाला, की त्यातून कोणी प्रवासदेखील करेनासे झाले. एकेकाळचा तो रमणीय देश आता त्यांनी निर्जन केला.’ ”