मुख्य मजकुरावर जा

Stubble बद्दल बायबलमधील वचने: Figurative of the wicked

11 वचने · 1 पैलू

Figurative of the wicked बद्दल वचने

  1. “तुमच्या ऐश्वर्याच्या महानतेने तुमच्या विरोधकांना तुम्ही खाली पाडले. स्वैर सोडलेल्या तुमच्या क्रोधाने; भुशाप्रमाणे त्यांना भस्म केले.

  2. ते कितीदा वार्‍यापुढे वाळलेल्या पेंढ्यांप्रमाणे असतात, व वादळापुढे उडविलेल्या भुशासारखे उडून जातात?

  3. हे माझ्या परमेश्वरा, वावटळीच्या धुळीगत, वार्‍याने उडणार्‍या भुशागत त्यांना करा.

  4. म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, तशीच त्यांची मुळे कुजून जातील, आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.

  5. लागण करताच, पेरणी करताच, ते जमिनीत मूळ धरू लागते तोच, ते त्यांच्यावर फुंकर घालतात आणि ते कोमेजून जाते, आणि भुशाप्रमाणे वारा ते वाहून नेतो.

  6. “पूर्वेकडून कोणी एकाला चिथविले, नीतिमत्वात त्यांची सेवा करण्यासाठी त्याला बोलाविले? राष्ट्रांना ते त्याच्या स्वाधीन करतात आणि राजांना त्याच्या अधीन करतात. ते त्याच्या तलवारीने त्यांची धूळधाण करतात, त्याच्या धनुष्याने वार्‍याने उडणारा भुसा करतात.

  7. ते निश्चितच भुसकटासारखे आहेत; अग्नी त्यांना भस्म करेल. ते अग्नीच्या सामर्थ्यापासून स्वतःचेही संरक्षण करू शकत नाहीत. हे ऊब देणारे निखारे नाहीत; ही जवळ बसविणारी शेकोटी नव्हे.

  8. “वार्‍यांनी भूस उडून जावे तसे मी तुला उडवून लावेन जणू वाळवंटी वाऱ्याने उडणारी.

  9. रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्‍या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे.

  10. याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील आणि स्वतःचेच मद्य पिऊन ते धुंद होतील; वाळलेल्या गवताप्रमाणे ते अग्नीमध्ये भस्म होतील.

  11. सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “निश्चितच तो दिवस येत आहे, जो धगधगत्या भट्टीसारखा ज्वलंत असेल. त्या भट्टीत गर्विष्ठ आणि दुष्ट लोक गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. तो दिवस येत आहे, जो त्यांना अग्नीत भस्मसात करेल. त्यांचे एकही मूळ अथवा फांदी त्यावर उरणार नाही.