मुख्य मजकुरावर जा

Stoning बद्दल बायबलमधील वचने: Capital punishment by

5 वचने · 1 पैलू

Capital punishment by बद्दल वचने

  1. त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी किंवा धनुष्यबाणाने मारावे; कोणीही त्यांना स्पर्श करू नये. ते मनुष्य असो वा प्राणी, त्यांना जिवंत राहू देऊ नये. जेव्हा एडक्याच्या शिंगाचा दीर्घ नाद कानी पडेल तेव्हाच त्यांनी पर्वताजवळ यावे.”

  2. त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

  3. ही घृणास्पद गोष्ट करणार्‍या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा.

  4. तर मात्र नगराच्या वडिलांनी त्या कन्येला तिच्या वडिलांच्या घराच्या दारापर्यंत न्यावे व तिथे नगरातील लोकांनी तिला मरेपर्यंत धोंडमार करावी. आपल्या आईवडिलांच्या घरात राहत असताना, व्यभिचारिणी होऊन तिने इस्राएलात घृणास्पद कृत्य केले आहे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष काढून टाकण्यात यावे.

  5. काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण मेंढरांची व बकर्‍याची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले होते.