Skip to content

Robbers बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;

  2. चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू;

  3. आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू;

  4. आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—

  5. माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;

  6. कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात.

  7. हे मंदिर ज्याने माझे नाव धारण केले आहे, तुमच्यासाठी लुटारूंची गुहा झाली आहे काय? परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिले आहे! अशी याहवेह घोषणा करीत आहेत.

  8. जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात, तसेच याजकांच्या टोळ्या शेखेमाच्या वाटेवर वध करतात, ते आपल्या दुष्ट योजना पूर्ण करतात.

  9. जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो, तेव्हा एफ्राईमचे पाप आणि शोमरोनचे अपराध प्रकट होतात. ते लबाडी करतात, चोर घरात चोरी करतात, लुटारू रस्त्यावर लूटमार करतात;