Rahab बद्दल बायबलमधील वचने: 2. A symbolic name applied to Egypt
2. A symbolic name applied to Egypt बद्दल वचने
“मी नोंद करेन की, राहाब आणि बाबिलोन हे देश माझे अस्तित्व मान्य करतात— पलेशेथ, सोर आणि कूश देखील असेच करतात— ते म्हणतील की, ‘हा सीयोनात जन्मलेला आहे.’ ”
तुम्ही रहाबास असे जमीनदोस्त केले जसे एखादे शव; तुमच्या शक्तिशाली बाहूने तुम्ही शत्रूंची दाणादाण केली.
इजिप्तकडे, ज्यांनी दिलेली अभिवचने निरुपयोगी आहेत. म्हणून मी इजिप्तला निरुपयोगी राहाब म्हणतो.
उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, पुरातन पिढीत जसे उठले होते. नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?