Skip to content

Pruning बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे.

  2. पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.

  3. ते राष्ट्रांमध्ये न्याय करतील, आणि अनेक लोकांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  4. मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”

  5. कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.

  6. तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार करा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा. दुर्बल असे म्हणो, “मी सबल आहे!”

  7. ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील, दूरदूरच्या बलाढ्य राष्ट्रांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  8. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.

  9. जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात.

  10. म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.

  11. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.

  12. जर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, तर त्या फांदीसारखे आहात जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून अग्नीत टाकून जाळतात.