Skip to content

Mouse बद्दल बायबलमधील वचने

6 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे,

  2. पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्‍यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्‍यांना त्याच पीडांनी पीडले आहे.

  3. ज्यामुळे देशाचा नाश होत आहे त्या पीडेच्या गाठींच्या आणि उंदरांच्या प्रतिमा तयार करा आणि इस्राएलच्या देवाला गौरव द्या. कदाचित तुमच्यावरून आणि तुमच्या दैवतावरून आणि तुमच्या देशावरून ते त्यांचा हात काढून घेतील.

  4. त्यांनी याहवेहचा कोश गाडीवर ठेवला आणि त्याबरोबरच्या पेटीत सोन्याचे उंदीर आणि पीडेच्या गाठींच्या सोन्याच्या प्रतिमा ठेवल्या.

  5. आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्‍यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.

  6. “जे स्वतःला पवित्र व शुद्ध करतात, ते बागेत जातील, मात्र जे डुकरे, उंदीर यासारखे इतर प्रकारचे निषिद्ध मांस खातात—अशा सर्व लोकांचा भयानक शेवट त्यांनी अनुसरलेल्या लोकांसह होईल,” अशी याहवेह घोषणा करतात.