Kidnapping बद्दल बायबलमधील वचने: Instance of
Instance of बद्दल वचने
म्हणून त्यांनी बिन्यामीन लोकांना अशी सूचना दिली, “जा आणि द्राक्षमळ्यात लपून बसा
आणि लक्ष ठेवा. तुम्ही तिथे जा आणि शिलोहतील कन्या त्यांचे नृत्य करण्यासाठी बाहेर येतील, तेव्हा तुम्ही द्राक्षमळ्यातून धावत बाहेर निघा आणि तुम्ही प्रत्येकाने एकएका तरुणीला धरून आपली पत्नी करून घ्यावी. नंतर बिन्यामीनच्या भूमीत परत यावे.
आणि जेव्हा त्यांचे वडील आणि भाऊ गार्हाणे घेऊन आमच्याकडे येतील, तेव्हा आम्ही त्यांना म्हणू, ‘आमच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी, कारण युद्धात आम्हाला त्यांच्यासाठी पत्नी मिळाली नाही. तुम्ही तुमची शपथ मोडल्याबद्दल दोषी ठरणार नाही, कारण तुम्ही तुमच्या कन्या त्यांना दिल्या नाहीत.’ ”
यासाठी बिन्यामीन लोकांनी हे केले. जेव्हा तरुण स्त्रिया नाचत होत्या, तेव्हा प्रत्येक पुरुषाने एकी एकीला धरले आणि तिला आपली पत्नी म्हणून घेऊन गेले. ते परत आपल्या वतनात आले आणि त्यांनी नगरे परत बांधली आणि ते त्यात राहू लागले.