मुख्य मजकुरावर जा

Hypocrites बद्दल बायबलमधील वचने: Worship of, not acceptable to God

8 वचने · 43 पैलू

Worship of, not acceptable to God बद्दल वचने

  1. “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही.

  2. जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा?

  3. अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही.

  4. तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे.

  5. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  6. ते म्हणतात, ‘आम्ही उपास केला, पण तुम्ही बघितलेही नाही? आम्ही नम्र झालो, आणि तुम्ही त्याकडे लक्षही दिले नाही?’ “तरी तुमच्या उपासाच्या दिवशी, तुम्ही मनाला वाटेल तसे करता आणि तुमच्या कामगारांची पिळवणूक करता.

  7. तुमचे उपास कलह व भांडणाने आणि एकमेकांशी दुष्टपणे मारामारी करण्याने संपतात. तुम्ही जसा उपास करता, तसा आता करून तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकला जाईल अशी अपेक्षा करता.

  8. असा उपास मी निवडला आहे काय, लोकांनी नम्र होण्याचा एक दिवस? केवळ वार्‍याने लवणार्‍या लव्हाळ्याप्रमाणे वाकण्याकरिता, आणि गोणपाट नेसून राख फासण्याकरिता? यालाच तुम्ही उपास म्हणता का, याहवेहला असा दिवस मान्य असेल काय?