मुख्य मजकुरावर जा

Hophni बद्दल बायबलमधील वचने

29 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आणि याहवेह शमुवेलास म्हणाले: “पाहा, मी इस्राएलमध्ये असे काहीतरी करणार आहे, जे ऐकून प्रत्येकाचे कान भणभणतील.

  2. एलीच्या घराण्याविषयी मी जे काही बोललो होतो ते; सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी करेन.

  3. कारण मी त्याला सांगितले की, जे पाप त्याला माहीत होते त्यासाठी मी सर्वकाळ त्याच्या कुटुंबाचा न्याय करेन; त्याच्या पुत्रांनी परमेश्वराची निंदा केली आणि एली त्यांना आवरू शकला नाही.

  4. म्हणून मी एलीच्या घराण्यासाठी अशी शपथ घेतली, ‘एलीच्या घराण्याच्या पापाचे प्रायश्चित यज्ञ किंवा अर्पणाने कधीही होणार नाही.’ ”