Skip to content

Heredity बद्दल बायबलमधील वचने

12 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो.

  2. परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.

  3. तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे. दुष्ट लोकांच्या संततीचा पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये.

  4. भूमीचे वतन मिळविण्यासाठी ते उठू नये आणि त्यांच्या शहरांनी पृथ्वी व्यापली जाऊ नये, म्हणून त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापांसाठी त्याच्या मुलांना मारून टाकण्यासाठी जागा तयार करा.

  5. “पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे: मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन; तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही, प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,” असे याहवेह म्हणतात. “कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”

  6. Your iniquities, and the iniquities of your fathers together, saith the LORD, which have burned incense upon the mountains, and blasphemed me upon the hills: therefore will I measure their former work into their bosom.

  7. “लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत, ‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि मुलांचे दात आंबले.’

  8. कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील.

  9. “तरीही तुम्ही विचारता, ‘मुलगा आपल्या पित्याचा दोष का वाहत नाही?’ मुलाने जे सरळ व योग्य ते केले व काळजीपूर्वक माझे सर्व विधी आचरले, म्हणून तो खचितच जगेल.

  10. जो पाप करतो तोच मरेल. आपल्या आईवडिलांचा दोष त्यांची संतती वाहणार नाही किंवा आईवडील आपल्या संततीचा दोष वाहणार नाहीत. नीतिमानाचे नीतिमत्व त्यांच्यासाठी मोजले जाईल आणि दुष्टाची दुष्टता त्यांच्याविरुद्ध मोजली जाईल.

  11. शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो.

  12. ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही.