Hair बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर.
जेव्हा तुझे वेढ्याचे दिवस संपतील, तेव्हा केसांचा तिसरा भाग शहरामध्ये जाळ. मग केसांचा तिसरा भाग शहराभोवती तलवारीने कापत जा. आणि तिसरा भाग वार्यावर उडव, कारण मी आपली तलवार उपसून त्यांचा पाठलाग करेन.
तसेच जी स्त्री डोक्यावर आच्छादन न घेता प्रार्थना करते किंवा संदेश सांगते, ती आपल्या पतीचा अनादर करते. तसे करणे म्हणजे जणू काय तिने आपल्या डोक्याचे मुंडण केल्यासारखे आहे.
एखाद्या स्त्रीला डोक्यावर आच्छादन घेण्याची इच्छा नसेल, तर तिने केस कापावे किंवा मुंडण करावे आणि केस कापणे किंवा मुंडण करणे हे तिला लाजिरवाणे वाटत असेल, तर तिने डोक्यावर आच्छादन घ्यावे.