Skip to content

Groves बद्दल बायबलमधील वचने

9 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्याच रात्री याहवेहने त्याला म्हटले, “वडिलांच्या कळपातील उत्तम सात वर्षांचा दुसरा गोर्‍हा घे. तुझ्या पित्याची बआल दैवताची वेदी पाडून टाक आणि तिच्याजवळ असणार्‍या अशेरा देवीचा खांब तोडून टाक.

  2. नंतर या उंचवट्यावर याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी योग्य प्रकारची वेदी बांधा. तू तोडलेल्या अशेरा खांबाच्या लाकडाचा वापर करून, होमार्पण म्हणून दुसरा गोर्‍हा अर्पण कर.”

  3. यास्तव गिदोनाने आपल्या नोकरांपैकी दहा नोकर बरोबर घेतले आणि याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे सर्वकाही केले. परंतु आपल्या पित्याच्या परिवारातील माणसांच्या व गावातील लोकांच्या भीतीने त्याने ते हवन दिवसाच्या ऐवजी रात्री केले.

  4. दुसर्‍या दिवशी पहाटेस गाव जागे होऊ लागले, तेव्हा बआल दैवताची वेदी मोडून पडलेली, तिच्याजवळच असलेला अशेराचा खांब नाहीसा झालेला, नवीन वेदी बांधलेली व तिच्यावर दुसर्‍या गोर्‍ह्याचे होमार्पण झालेले दृष्टीस पडले!

  5. त्याचे वडील हिज्कीयाहने नष्ट केलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; इस्राएलचा राजा अहाबने केल्याप्रमाणे त्यानेही बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली.

  6. त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्याबद्धल याहवेहने म्हटले होते, “मी यरुशलेमात माझे नाव ठेवेन.”

  7. याहवेहच्या मंदिराच्या दोन अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या.

  8. त्याने आपल्याच पुत्राचे अग्नीत अर्पण केले, जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट तसे पुष्कळ काही करून याहवेहचा राग पेटविला.

  9. त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.