मुख्य मजकुरावर जा

Godly Fear बद्दल बायबलमधील वचने: Impartial administration of justice

4 वचने · 50 पैलू

"Godly Fear" साठी शोधा

Impartial administration of justice बद्दल वचने

  1. त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही काय करता ते नीट विचार करा, कारण तुम्ही केवळ मर्त्यांसाठी न्याय करीत नाही, परंतु याहवेहसाठी निर्णय घेता. जेव्हा तुम्ही जे काही करीत असता तेव्हा ते तुमच्याबरोबर आहेत.

  2. आता याहवेहचे भय तुम्हावर असू द्या, काळजीपूर्वक न्याय करा, कारण आमचे परमेश्वर याहवेह यांच्याकडे अन्याय किंवा पक्षपात किंवा लाचलुचपत असे काही चालत नाही.”

  3. यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते.

  4. त्याने त्यांना असे आदेश दिले: “तुम्ही याहवेहचे भय बाळगूनच विश्वासूपणाने आणि संपूर्ण अंतःकरणाने सेवा करावी.