Skip to content

Gleaning बद्दल बायबलमधील वचने: Laws concerning

4 वचने · 3 पैलू

Laws concerning बद्दल वचने

  1. “ ‘तुम्ही पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये आणि शेतात हंगामानंतर राहिलेला सरवा गोळा करू नये.

  2. तुमच्या द्राक्षमळ्यावर दुसर्‍यांदा जाऊ नका अथवा पडलेली द्राक्षे गोळा करू नका. गोरगरिबांसाठी आणि परदेशीयांसाठी ती तिथेच राहू द्यावी. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  3. पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.

  4. तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.