Frankincense बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.
आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांच्याकडे ते आणावे. याजक मूठभर पीठ आणि तेल घेतील, त्याचबरोबर सर्व धूप स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर एकत्र जाळतील, हे अन्नार्पण, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
त्यावर जैतुनाचे तेल व धूप ठेवावे; ते धान्यार्पण आहे.
याजकाने त्या चिरडलेल्या धान्याचा आणि तेलाचा स्मरणभाग, सर्व धूपांबरोबर एकत्र जाळावा, याहवेहसाठी अर्पण असे हे एक अन्नार्पण असावे.
“पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्यास कोणीच उरले नाही:
सोने, चांदी, हिरे, रत्ने, तलम कापड, जांभळे आणि किरमिजी रेशमी कापड, सर्वप्रकारचे चंदनी व सुगंधी लाकूड, हस्तदंती माल, मोलवान लाकडाचे कोरीव नक्षीकाम, कास्य, लोखंड, संगमरवरी दगड,
तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम सपीठ व गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारे लोक.