Skip to content

David बद्दल बायबलमधील वचने

4 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल.

  2. मी याहवेह त्यांचा परमेश्वर होईन आणि माझा सेवक दावीद त्यांच्यात राजपुत्र असेल. मी याहवेह हे बोललो आहे.

  3. “ ‘माझा सेवक दावीद, त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमांचे अनुसरण करतील आणि माझे विधी काळजीपूर्वक पाळतील.

  4. माझा सेवक याकोबाला मी दिलेल्या देशात, जिथे तुमचे पूर्वज राहिले तिथे ते राहतील. ते व त्यांची लेकरे आणि त्यांच्या लेकरांची लेकरे सर्वकाळ तिथे राहतील आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा राजपुत्र असेल.