Skip to content

Damages and Compensation बद्दल बायबलमधील वचने

23 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. “जर लोक आपसात भांडत असताना एकाने दुसर्‍याला दगडाने किंवा बुक्कीने मारले आणि पीडित व्यक्ती मेली नाही, परंतु आपले अंथरूण धरून राहिली,

  2. आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा.

  3. “एखाद्या बैलाने एखाद्या पुरुष किंवा स्त्रीस हुंदडून जिवे मारले, तर त्या बैलास धोंडमार करून ठार मारावे व त्याचे मांस खाऊ नये. परंतु बैलाचा मालक निर्दोष असून जबाबदार असणार नाही.

  4. पण बैल मारका आहे याबद्दल त्याच्या मालकाला सूचना देऊनही त्याने त्या बैलाला बांधून ठेवले नाही व तो एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकतो, तर त्या बैलाला धोंडमार करावी व त्याच्या मालकास सुद्धा जिवे मारावे.

  5. परंतु जर त्याच्याकडून खंडणी मागितली असेल, तर जेवढी रक्कम मागितली ती देऊन तो मालक आपला जीव वाचवू शकतो.

  6. एखाद्याच्या पुत्राला किंवा कन्येला बैलाने हुंदडून मारले, तरी हाच नियम लागू व्हावा.

  7. पण बैलाने जर एखाद्या स्त्री किंवा पुरुष गुलामाला हुंदडून मारले, तर त्या गुलामाच्या मालकाला बैलाच्या मालकाने तीस चांदीची नाणी द्यावीत व बैलाला धोंडमार करावी.

  8. “जर कोणी एखादा खड्डा उघडला किंवा खणला व तो झाकला नाही आणि त्यात बैल किंवा गाढव पडले,

  9. तर ज्याने तो खड्डा उघडला त्याने जनावराच्या मालकाला त्याची किंमत मोजून द्यावी व त्याबदल्यात ते मेलेले जनावर घ्यावे.

  10. याहवेह मोशेला म्हणाले:

  11. “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्‍याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो

  12. किंवा जर कोणाला हरवलेली वस्तू सापडली आणि त्याबद्दल ते खोटे बोलतील आणि तिच्याविषयी खोटी शपथ वाहतील किंवा जर लोकांनी केलेल्या अशा पापाबद्दल ते खोटे बोलतील,

  13. अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी—

  14. किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा.

  15. एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली

  16. आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,”

  17. तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा.

  18. तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही.

  19. आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे,

  20. आणि मग नगरातील वडील मंडळीने त्या पुरुषाला घ्यावे आणि त्याला शिक्षा द्यावी.

  21. शंभर चांदीची नाणी दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये.

  22. जर एखाद्या पुरुषाने जिचा वाङ्निश्चय झालेला नसेल, अशा कुमरिकेवर बलात्कार केला आणि ते करीत असताना तो आढळला,

  23. तर त्याने मुलीच्या वडिलांना पन्नास चांदीची नाणी दंड म्हणून दिली पाहिजेत आणि त्या कुमारिकेशी विवाह केला पाहिजे, कारण त्याने तिला भ्रष्ट केले. तो जिवंत असेपर्यंत तिला घटस्फोट देऊ शकत नाही.