Skip to content

Court बद्दल बायबलमधील वचने: Contempt of

11 वचने · 4 पैलू

Contempt of बद्दल वचने

  1. तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.

  2. त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील.

  3. ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.

  4. ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.

  5. याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेला, त्यावेळी पदावर असलेल्या न्यायाधीशाचा अथवा याजकांचा निर्णय न पाळण्याचे धाडस जो कोणी करेल, त्याला मृत्यूची शिक्षा दिली जावी. अशा रीतीने इस्राएलातून तुम्हाला ही दुष्टाई काढून टाकता येईल.

  6. हे सर्व लोक ऐकतील व भयभीत होतील आणि पुढे ते उन्मत्तपणा करणार नाहीत.

  7. मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सदसद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.”

  8. यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला.

  9. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”

  10. पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!”

  11. पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”