मुख्य मजकुरावर जा

Appeal बद्दल बायबलमधील वचने: Paul makes appeal to Caesar

9 वचने · 1 पैलू

Paul makes appeal to Caesar बद्दल वचने

  1. परंतु पौलाने त्याला उत्तर दिले: “मी कैसराच्या न्यायालयापुढे उभा आहे म्हणून इथेच माझा न्याय होईल. तुम्हाला चांगले ठाऊक आहे की, मी यहूदीयांच्या विरुद्ध काहीही उपद्रव केले नाही.

  2. जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!”

  3. परंतु पौलाने कैसराकडे न्याय मागितला, तेव्हा मी त्याला बादशहाकडे नेण्याची व्यवस्था होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा हुकूम दिला.”

  4. त्यावर अग्रिप्पा फेस्तास म्हणाला, “मला स्वतः या माणसाचे म्हणणे ऐकायला आवडेल.” फेस्ताने उत्तर दिले. “तर उद्याच त्याचे भाषण ऐकावयास मिळेल.”

  5. तेव्हा दुसर्‍या दिवशी, अग्रिप्पा व बर्णीका ही न्यायालयात मोठ्या रुबाबाने लष्करी अधिकार्‍यांच्या समवेत व शहरातील प्रमुख पुरुषांसह आले. फेस्ताच्या आदेशानुसार पौलाला न्यायालयात आणण्यात आले.

  6. मग फेस्त म्हणाले: “अग्रिप्पा महाराज आणि सर्व उपस्थिती लोकहो, या मनुष्याला पाहा! याच्याविरुद्ध सर्व यहूदी समाजाने यरुशलेम व कैसरीया, यांनी माझ्याकडे विनंती केली आहे आणि अशी ओरड करीत आहेत की त्याने अधिक काळ जिवंत राहू नये.

  7. माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरविले आहे.

  8. परंतु मी महाराजांना निश्चित काय लिहून कळवावे हे मला समजत नाही आणि म्हणूनच मी त्याला तुम्हासर्वांपुढे व विशेषकरून अग्रिप्पा राजांपुढे चौकशी साठी आणले आहे, यासाठी की मला जे योग्य ते लिहिता येईल.

  9. कारण एखाद्या कैद्यावर असलेल्या कोणत्याही आरोपाचे स्पष्ट वर्णन केल्याशिवाय त्याला रोमला पाठविणे योग्य होणार नाही.”