मुख्य मजकुरावर जा

Teman

6 verses

30.2000, 35.7300 गूगल नकाशावर पाहा

Teman चा उल्लेख असलेली वचने

  1. एदोम्यांविषयी: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का? शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय? त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय?

  2. एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्‍या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.

  3. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील.

  4. म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”

  5. तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण कापला जाईल.

  6. परमेश्वर तेमान वरून आले, परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे.