Skip to content

Cushi

5 वचने

Cushi चा उल्लेख असलेली वचने

  1. नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला.

  2. सादोकाचा पुत्र अहीमाज योआबाला म्हणाला, “जे होईल ते होवो, मला कूशी मनुष्याच्या मागे धावू दे.” योआबाने उत्तर दिले, “माझ्या मुला, तुला का जायचे आहे? तुला बक्षीस मिळवून देईल अशी बातमी तुझ्याजवळ नाही.”

  3. तो म्हणाला, “जे होईल ते होवो, मला धावायचे आहे,” तेव्हा योआब म्हणाला, “धाव!” तेव्हा अहीमाज मैदानाच्या मार्गाने धावू लागला आणि कूशी माणसाच्या पुढे गेला.

  4. नंतर कूशी मनुष्य येऊन पोहोचला आणि म्हणाला, “माझे राजा, माझे स्वामी, चांगली बातमी ऐका! आपल्याविरुद्ध उठलेल्या लोकांच्या हातातून याहवेहने तुम्हाला सोडवून तुमची सुटका केली आहे.”

  5. राजाने कूशी मनुष्याला विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे का?” त्या कूशी मनुष्याने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाला जे सर्व इजा करण्यास आपणाविरुद्ध उठतात त्या आपल्या सर्व शत्रूंचे त्या तरुणाप्रमाणेच होवो.”