Skip to content

स्तोत्रसंहिता९७

प्रभू वैभवाने राज्य करतो

१
याहवेह राज्य करतात, सर्व पृथ्वी उल्हासित होवो; दूर असलेले तटवर्ती क्षेत्रही हर्ष करोत.
२
मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत; धार्मिकता आणि न्याय त्यांच्या राजासनाचा पाया आहे.
३
अग्नी त्यांच्यापुढे चालतो, आणि त्यांच्या शत्रूंना तो सर्व बाजूने भस्म करतो.
४
त्यांच्या विजा जगाला प्रकाश देतात; हे पाहून पृथ्वी कंपित होते.
५
याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश व सगळे पर्वत मेणाप्रमाणे वितळतात.
६
आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते; संपूर्ण मानवजात त्यांचे गौरव पाहते.

मूर्तिपूजा व देवतांवरील न्याय

७
जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते, ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले. सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा!
८
सीयोन ऐकते व उल्हासित होते, याहवेह, तुमच्या निर्णयामुळे, यहूदीयातील गावे हर्षभरित होतात.
९
कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात; सर्व दैवतांहून तुम्ही अत्यंत थोर आहात.

प्रेम व पवित्रतेचे आवाहन

१०
याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत, कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात.
११
नीतिमानांवर प्रकाश उजळतो आणि निष्ठावंताची हृदये हर्ष पावतात.
१२
सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा, आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options