- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
स्तोत्रसंहिता९२
Listen to this chapter
0:00
0:00
उपासना व उपकारस्तुतीचे आवाहन
१
एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित. याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.
२
प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,
३
दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.
४
हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता; तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.
देवाची महानता व दुष्टांचा मूर्खपणा
५
हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!
६
मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही; मूर्खांना हे समजत नाही की,
७
दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.
८
परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!
९
हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा, निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल, आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.
वैयक्तिक निर्दोषत्वसिद्धीचे आश्वासन
१०
परंतु तुम्ही माझे शिंग रानबैलासारखे उंच केले आहे; नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.
११
माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला; माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.
नीतिमानांचे टिकणारे फलद्रुपत्व
१२
नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील, ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;
१३
जे याहवेहच्या घरात रोपलेले, आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.
१४
वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील, आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.
१५
ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत; ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note