मुख्य मजकुरावर जा

स्तोत्रसंहिता१२४

परमेश्वर आमच्या बाजूने नसता तर

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते, जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता. तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते;
जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतो व जलप्रवाहात आम्ही पार वाहून गेलो असतो,
उचंबळलेल्या लाटांनी आम्हाला गिळंकृत केले असते.

महासुटकेबद्दल स्तुती

याहवेह धन्यवादित असोत; त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.
पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा, त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो; पाश तुटलेला आहे आणि आम्ही मुक्त झालो आहोत.
आमच्या साहाय्याचा उगम, स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options