Skip to content

स्तोत्रसंहिता१२२

यरुशलेमेत आनंदाने आगमन

१
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.”
२
अगे यरुशलेमे, आम्ही आता आपले पाऊल तुझ्या वेशीच्या आत ठेवले आहे.

पवित्र नगरीचा उद्देश

३
यरुशलेम नगरी अशी बांधलेली आहे, जशी एखादी सुसंबद्धपणे रचलेली नगरी.
४
हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत.
५
इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे सिंहासन स्थापित केले आहे.

यरुशलेमच्या शांतीचा शोध घेण्याचे आवाहन

६
यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की या नगरीवर प्रीती करणार्‍या सर्वांची सुरक्षा होवो.
७
तुझ्या तटांच्या आत शांती नांदो; तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो.
८
जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो, “तुझ्यामध्ये शांती नांदो.”
९
आपले परमेश्वर याहवेह, यांच्या मंदिराप्रीत्यर्थ, तुझा उत्कर्ष व्हावा, अशी अभिलाषा करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options