- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
गणना२९
Listen to this chapter
0:00
0:00
कर्ण्यांच्या सणाची अर्पणे
१
“ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे.
२
याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत.
३
गोर्ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश;
४
आणि सात कोकर्यातील प्रत्येकासाठी एफाचा एक दशांश.
५
तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बोकड अर्पावा.
६
मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.
प्रायश्चित्ताच्या दिवसाची अर्पणे
७
“ ‘याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक पवित्र सभा भरवा. तुम्ही स्वसुखाचा त्याग करावा व कोणतेही नियमित काम करू नये.
८
याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत;
९
गोर्ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे;
१०
आणि सात कोकर्यातील प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.
११
प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा.
मंडपांच्या सणाची अर्पणे: पहिला दिवस
१२
“ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र सभा बोलवा आणि त्या दिवशी कोणतीही नियमित कामे करू नये. हा सण तुम्ही याहवेहसाठी सात दिवस पाळावा.
१३
आणि तुम्ही याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून तेरा गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत.
१४
या प्रत्येकी तेरा गोर्ह्यांबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक एफाचे तीन दशांश बारीक पीठ; व दोन मेंढ्यांबरोबर प्रत्येकी दोन दशांश;
१५
आणि चौदा कोकर्यांबरोबर प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.
१६
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
मंडपांचा दुसरा दिवस
१७
“ ‘दुसर्या दिवशी, बारा तरुण गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावे व हे सर्व निर्दोष असावेत.
१८
गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
१९
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
मंडपांचा तिसरा दिवस
२०
“ ‘तिसर्या दिवशी अकरा गोर्हे, दोन मेंढे, व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी. हे सर्व निर्दोष असावेत.
२१
गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
२२
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
मंडपांचा चौथा दिवस
२३
“ ‘चौथ्या दिवशी दहा गोर्हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत.
२४
गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
२५
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
मंडपांचा पाचवा दिवस
२६
“ ‘पाचव्या दिवशी नऊ गोर्हे, दोन मेंढे व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.
२७
गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
२८
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
मंडपांचा सहावा दिवस
२९
“ ‘सहाव्या दिवशी आठ गोर्हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.
३०
गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
३१
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
मंडपांचा सातवा दिवस
३२
“ ‘सातव्या दिवशी सात गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.
३३
गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
३४
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
आठव्या दिवसाच्या सभेची अर्पणे
३५
“ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये.
३६
याहवेहसाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे सुवासिक अन्नार्पण म्हणजेच होमार्पण अर्पावे. हे सर्व निर्दोष असावेत.
३७
गोर्हा, मेंढा व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
३८
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
सारांश आणि आज्ञा
३९
“ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ”
४०
याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही इस्राएली लोकांना सांगितले.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Options
Study Note