सफन्याह १:१४-१५
१४
याहवेहचा तो भयावह दिवस जवळ— तो वेगाने अगदी जवळ येत आहे. याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे; सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.
१५
तो दिवस क्रोधाग्नीचा दिवस असेल— तो दिवस दुःखाचा व क्लेशाचा, तो दिवस अरिष्ट व उजाडतेचा, तो दिवस अंधकाराचा व उदासीनतेचा, तो दिवस अभ्रांचा व निबिड काळोखाचा—