Skip to content
जखऱ्याह ११:३

जखऱ्याह ११:३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
हे लबानोना, आपल्या वेशी उघड, म्हणजे अग्नी तुझ्या गंधसरूच्या वृक्षांना भस्म करेल!
अहो सनोवरच्या वृक्षांनो, गंधसरूच्या सर्व नष्ट झालेल्या वृक्षांसाठी आकांत करा; डौलदार वृक्ष उद्ध्वस्त झाले आहेत! बाशानातील एलावृक्षांनो, आकांत करा; घनदाट वने तोडून टाकली जात आहेत!
मेंढपाळांचा आकांत ऐका; त्यांची सुपीक कुरणे नष्ट झाली आहेत! सिंहाच्या गर्जना ऐका; यार्देनेच्या खोऱ्यातील गर्द झाडी उद्ध्वस्त झाली आहे.
मग माझे परमेश्वर याहवेह असे म्हणाले: “कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा मेंढपाळ हो.
त्यांचे ग्राहक त्यांची कत्तल करतात आणि त्याबद्दल काहीही शिक्षा न होता निसटून जातात. जे त्यांना विकतात, ते म्हणतात, ‘याहवेहची उपकारस्तुती असो, मी श्रीमंत आहे!’ त्यांचे स्वतःचे मेंढपाळदेखील त्यांना दयामाया दाखवित नाहीत.
या देशातील लोकांची मी देखील गय करणार नाही,” असे याहवेह जाहीर करतात. “मी प्रत्येकाला त्यांच्या शेजाऱ्याच्या व त्यांच्या राजांच्या हाती देईन. ते देश उद्ध्वस्त करतील आणि मी त्यांच्यापासून कोणालाही सोडविणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options