Skip to content
गीतरत्न ८:१३

गीतरत्न ८:१३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १३ दाखवत आहे.
१०
मी एक भिंत आहे, आणि माझे स्तन बुरुजासारखे आहेत. अशाप्रकारे मी माझ्या प्रियकराच्या नजरेत त्याला समाधान आणणारी झाले आहे.
११
बआल-हामोन येथे शलोमोनचा एक द्राक्षमळा होता; तो त्याने तेथील कुळांना खंडाने दिला. त्याचे फळ म्हणून प्रत्येकाने हजार चांदीची शेकेल द्यायची होती.
१२
परंतु माझ्याकडे स्वतःचा द्राक्षमळा आहे; शलोमोन, हजार शेकेल तुझीच आहेत, आणि मळ्याची देखरेख करणार्‍यांना मी दोनशे नाणी देईन.
१३
बागेत राहणार्‍या माझ्या प्रिये, तुझ्या सख्या तुझ्या सेवेत हजर असतात, मला तुझा स्वर ऐकू दे!
१४
माझ्या प्रियसख्या, लवकर ये, आणि हरिणीसारखा हो, किंवा सुगंधाने भरलेल्या डोंगरावरील तरुण काळवीटा प्रमाणे हो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options