गीतरत्न ७:१०
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १० दाखवत आहे.
७
तू खजुरीच्या झाडासारखी सडपातळ आहेस. खजुरीच्या घोसासारखे तुझे स्तन आहेत.
८
मी म्हटले, मी खजुरीच्या झाडावर आरोहण करेन आणि त्याच्या घोसांना धरीन; तुझे स्तन द्राक्षवेलीमध्ये द्राक्षांच्या गुच्छासारखे होवोत, आणि तुझा श्वास सफरचंदासारखा सुवासिक होवो,
९
तुझे मुख उत्तम द्राक्षारसासारखे होवो. नायिका द्राक्षारस ओठांवरून दातांना स्पर्श करून, थेट माझ्या प्रिये कडे जावो,
१०
मी माझ्या प्रियकराची आहे, आणि तो माझीच कामना करतो.
११
माझ्या प्रिया, ये, चल, आपण रानावनात जाऊ, गावामध्ये रात्र घालवू.
१२
सकाळीच उठून आपण द्राक्षमळ्यात जाऊ; द्राक्षवेली मोहरल्या आहेत की काय, त्यांना कळ्या आल्यात की काय ते पाहू. डाळिंबाच्या झाडांना फुले आलीत काय ते पाहू. आणि तिथे मी माझ्या प्रीतीचा वर्षाव करेन.
१३
त्या ठिकाणी दुदाफळाचे सुगंध दरवळत असतात, आणि दुर्मिळ फळे आमच्या दाराशीच उपलब्ध होतात नवीन आणि जुनीही फळे, ही सर्व माझ्या प्रियकरासाठी राखून ठेवली आहेत.
Settings