Skip to content
गीतरत्न १:८

गीतरत्न १:८

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्‍याच्या पडद्यासारखी.
मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, कारण मी सूर्यामुळे काळवंडले आहे. माझ्या आईची मुले माझ्यावर रागावली आणि त्यांनी मला द्राक्षमळ्याची राखण करावयास लावले; पण मी स्वतःच्या द्राक्षमळ्याकडे दुर्लक्षित केले.
मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग, तुझा कळप तू कुठे चरावयास नेतो आणि मध्यानाच्या वेळी तू तुझ्या मेंढ्यांना कुठे विसाव्याला लावतोस. पडद्यात असलेल्या स्त्रीप्रमाणे तुझ्या सोबत्यांच्या कळपाच्या बाजूला मी का असावे?
अगे स्त्रियांमधील परमसुंदरी, जर तुला ठाऊक नाही, तर कळपांच्या ठशांचे अनुसरण करत ये आणि मेंढपाळाच्या तंबूशेजारी तू आपली करडे चार.
माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी, मी तुझी तुलना करतो.
१०
तुझे गाल कर्णभूषणासह, तुझा गळा दागिन्यांच्या साखळीसह किती सुंदर आहे.
११
आपण तुझ्यासाठी सोन्याचे, रुपेजडित असे कर्णभूषण घडवून घेऊ.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options