Skip to content
रोमकरांस ११:२५-३२

इस्राएलच्या पुनर्स्थापनेचे गूढ

रोमकरांस ११:२५-३२
२५
प्रिय बंधूंनो व भगिनींनो, या रहस्याविषयी तुम्ही अजाण नसावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की तुम्ही बढाई मारू नये: गैरयहूदी लोकांची ठरलेली संख्या पूर्ण विश्वासात येईपर्यंत इस्राएली लोक काही प्रमाणात कठोर झाले आहेत,
२६
आणि याप्रकारे सर्व इस्राएलचे तारण होईल. याविषयी लिहिले आहे: “सीयोनातून तारणारा येईल; व तो याकोबाला सर्व अभक्तीपासून वळवेल.
२७
मी त्यांची पापे हरण करेन. आणि त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे.”
२८
शुभवार्तेच्या दृष्टिकोनातून पाहता, ते तुमचे शत्रू आहेत; निवडीच्या दृष्टिकोनातून पाहता पूर्वजांसाठी ते अजूनही परमेश्वराला प्रिय असेच आहेत.
२९
कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात.
३०
एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे,
३१
आता परमेश्वराची जी दया तुमच्यावर झाली त्याचा परिणाम म्हणून, जे आज्ञा उल्लंघन करणारे झाले, त्यांना आता दया प्राप्त होईल.
३२
कारण सर्वांवर दया करावी म्हणून परमेश्वराने त्या सर्वांना आज्ञा मोडणार्‍यांसोबत बांधले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options