Skip to content
प्रकटीकरण २१:२०-२७

प्रकटीकरण २१:२०-२७

२०
पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता.
२१
बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेस एकाच मोत्याची होती. शहराचा विशाल राजमार्ग काचेसारखा पारदर्शक शुद्ध सोन्याचा होता.
२२
नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते.
२३
नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे.
२४
राष्ट्रे त्यांच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील.
२५
तिच्या वेशी दिवसा बंद होत नाहीत; तिथे रात्र नाहीच.
२६
सर्व राष्ट्रांचे वैभव आणि प्रतिष्ठा, नगरीमध्ये आणण्यात येईल.
२७
मात्र त्या नगरीत कोणतीही अपवित्र गोष्ट, लज्जास्पद किंवा असत्य आचरण करणाऱ्यांचा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यांची नावे कोकर्‍याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच या नगरीत प्रवेश करतील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options