Skip to content
प्रकटीकरण २०:१-३

सैतानाला हजार वर्षांसाठी बांधून ठेवले जाते

प्रकटीकरण २०:१-३
मग मी एक देवदूत स्वर्गातून खाली उतरतांना पाहिला. त्याच्याजवळ अथांग कूपाची किल्ली होती. त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता.
त्याने त्या अजगराला, त्या पुरातन सापाला, जो पिशाच्च किंवा सैतान आहे त्याला धरले आणि एक हजार वर्षांसाठी साखळदंडाने जखडून टाकले,
आणि अथांग कूपात टाकले. हा हजार वर्षांचा काळ पूर्ण होईपर्यंत अजगराने इतःपर कोणत्याही राष्ट्राला फसवू नये म्हणून त्याने अथांग कूप बंद केले आणि त्याला कुलूप लावून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्याला थोड्या काळासाठी मोकळे सोडण्यात येईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options