Skip to content
प्रकटीकरण २:२-५

प्रकटीकरण २:२-५

तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्‍यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.
माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे.
परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे.
तुम्ही कसे पतन पावलात याची आठवण करा! पश्चात्ताप करा आणि जी कृत्ये तुम्ही पूर्वी करीत होता ती करा. जर तुम्ही पश्चात्ताप करणार नाही, तर मी तुमच्याकडे येईन आणि तुमची समई तिच्या स्थानापासून दूर करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options