Skip to content
प्रकटीकरण १५:१-४

प्रकटीकरण १५:१-४

आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिले: अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला.
मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या.
ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!
हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही? कारण तुम्हीच पवित्र आहात! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options