Skip to content
स्तोत्रसंहिता ९८:४-९

स्तोत्रसंहिता ९८:४-९

अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा;
वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा, वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा,
शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत— याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा.
महासागर व त्यामधील सर्व स्तुतीचा हर्षनाद करोत, तसेच पृथ्वी आणि त्यावर राहणारे सर्व प्राणीही करोत.
नदीच्या लाटा टाळ्या वाजवोत, डोंगर व टेकड्या परमेश्वरासमोर हर्षगान करोत;
ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options