Skip to content
स्तोत्रसंहिता ९०:१-६

हे प्रभू, पिढ्यान्पिढ्या तू आमचे निवासस्थान राहिला आहेस

स्तोत्रसंहिता ९०:१-६
परमेश्वराचे प्रिय पात्र, मोशेची एक प्रार्थना हे प्रभू, पिढ्यान् पिढ्या तुम्ही आमचे वसतिस्थान आहात.
पर्वत निर्माण होण्यापूर्वी, सृष्टीची घडण होण्यापूर्वी, अनादि ते अंतापर्यंत तुम्हीच परमेश्वर आहात!
“मर्त्य मनुष्या, मातीत परत जा” असे शब्द बोलून, मनुष्याला तुम्ही मातीत परत पाठविता.
हजार वर्षे ही तुम्हाला असे आहेत, जसा कालचा गेलेला एक दिवस, किंवा रात्रीचा एक प्रहर.
तुम्ही लोकांना झटकन मृत करून असे नाहीसे करता— जसे सकाळचे हिरवेगार कोमल गवत:
ते सकाळी नवीन उगवते, पण सायंकाळपर्यंत करपून जाते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options