स्तोत्रसंहिता ८४:१-२
१
संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!
२
याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.