स्तोत्रसंहिता ८४:१-४
१
संगीत निर्देशकाकरिता. गित्तीथ वर आधारित. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र. हे सर्वशक्तिमान याहवेह, तुमचे निवासस्थान किती रम्य आहे!
२
याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.
३
हे सर्वशक्तिमान याहवेह, माझ्या राजा आणि माझ्या देवा, तुमच्या वेद्यांजवळ चिमणीला घरटी बांधण्याचे, व निळवीला देखील आपली पिल्ले ठेवण्याचे ठिकाण सापडले आहे.
४
जे तुमच्या मंदिरात राहू शकतात, ते किती धन्य आहेत; ते निरंतर तुमचे स्तवन करतात. सेला
Settings